होर्टी ,दि.२६ : 
तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथे रविवार  दि. २५ रोजी संध्याकाळी ५  वाजणाच्या सुमारास  विजेच्या कडकडाटसह वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदारपणे झोडपुन काढले. यावेळी वीज पडुन दोन म्हशी जागीच मृत्युमुखी पडल्या. 

झालेल्या पावसामुळे परिसरातील फळ बागेचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले. वीज कोसळून होर्टी येथील रहवाशी श्रावण कांबळे यांच्या शेतात झाडाखाली बांधलेल्या दोन म्हशीचे  मृत्यू झाला. या घटनेमुळे  शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

होर्टी गावच्या परिसरात द्राक्ष ,आंब्याचे नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोना महामारी चालु असुन दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
 
Top