कुन्सावळी,दि. २६  
तुळजापूर तालुक्यातील कुन्सावळी येथे संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील सार्वजनिक  परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले. "माझे गाव कोरोना मुक्त गाव" मोहिमे अंतर्गत गावात सर्वेक्षण  करून नागरिकांना आजार व त्याची लक्षणे याबाबत सुचना देण्यात आल्याची माहिती सरपंच सौ. कविता गायकवाड यांनी दिली.  


कुन्सावळी ता. तुळजापूर जि.प.प्राथमिक शाळा, मंदिर परिसर, नवीन वस्ती याठिकाणी सॅनिटायजर फवारणी करण्यात आली. तसेच कोरोना कक्षाचे कर्मचारी यानी गावात फिरून गृहभेटी देवून लसीकरणाबाबत जागृती,  कटुंबसदस्य नावे, वय, लस घेतली का, तापमान, ऑक्सिजन, आजार, सूचना,मोबाईल क्र. इत्यादी बाबींचे नोंद घेत आहेत. 


याप्रसंगी सरपंच कविता शण्मुख गायकवाड, उपसरंपच रूपाली शिंदे, शिवराम शिंदे , भानूदास काकडे, ग्रामसेवक महेश स्वामी, शिक्षक  रावसाहेब पवार , प्रमोद जोशी, अंगणवाडी कार्यकर्ती सविता शिंदे, अशा कार्यकर्ती यास्मीन मुल्ला, शण्मुख गायकवाड, अर्जुन शिंदे, आकाश माळकुंजे, सुधाकर शिंदे, सखाराम जंगाले, लहू देडे आदीजण उपस्थित होते.
 
Top