तुळजापूर, दि.२३ :  

 कोरोना महामारीच्या काळामध्ये  रुग्ण दवाखान्यामध्ये उपचार घेत असुन अनेकजण वेळेवर औषधे मिळत नसल्याने त्यांचा मृत्यु होताना दिसत आहे.

 कोरोना  रुग्णाच्या उपचारासाठी रेमेडीसीवीर  इंजेक्शन वापरात येत असल्यामुळे त्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. तसेच गोरगरीब रुग्णांना ते विकत घेणे परवडत नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. म्हणून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने रेमेडीसीवीर  इंजेक्शन खरेदी करून तुळजापूर तसेच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात त्याचा पुरवठा करावा असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  तुळजापूरच्या वतीने व्यवस्थापक तथा तहसीलदार श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांना देण्यात आले.

 यावेळी ज्येष्ठ नेते धनंजय पाटील, तालुकाध्यक्ष धैर्यशील  पाटील, युवक अध्यक्ष संदीप गंगणे, मंदिर संस्थानचे कर्मचारी जयसिंग पाटील  आदी उपस्थित होते.
 
Top