नंदगाव, दि.२३: वैभव पाटील 
  तुळजापूर तालुक्यातील  नंदगाव ग्रामपंचायती च्यावतीने शुक्रवार दि.२३ एप्रिल  रोजी गावातील सर्व  व्यवसायिक नागरिकांची कोरोना तपासणी  करण्यात आली. या तपासणी मोहीमेस उत्सर्फुत  प्रतिसाद मिळाला. दरम्यान यावेळी सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.   
  
       
 नंदगाव येथील उपकेंद्रात शुक्रवार रोजी कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे आरोग्य केंद्राच्यावतीने गावातील दुकानदारांना कोरोना चाचणी करून घेण्याबाबत नोटीस बजाण्यात आली होत.   माझे दुकान माझी जबाबदारी"माझे गाव कोरोना मुक्त गाव अभियानांतर्गत कोरोना चाचणी मोहिमेला  दुकानदारांनी चांगला प्रतिसाद  दिला. या मोहिमेत 25 दुकानदारांची कोरोना चाचणी करण्यात आली.  सर्वाचे अवहाल निगेटिव्ह आले असुन दुकानदारांनी आपला कोरोना चाचणी अहवाल दुकानाच्या दर्शनी भागात लावण्याचे सांगण्यात आले.  


यावेळी उपस्थिती  प्राथमिक  उपकेंद्र वैद्यकिय अधिकारी डाँ सुप्रिया मोकाशे , आरोग्य सेवक जगताप डी.जे, आरोग्यसेविका मगर,   वैभव पाटील ,आशा कार्यकर्ती   आदीसह कर्मचारी उपस्थित  होते.
 
Top