वागदरी,दि.८: 
वागदरी ता. तुळजापूर येथिल  आशाकार्यकर्ती सौ. वैशाली हानमंत बिराजदार वय ३७ वर्ष  यांचे गुरुवार  दि. ८ एप्रिल  रोजी पहाटे  निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली ,एक मुलगा सासु ,एक दिर ,जाऊ ,पुतणे असा परिवार आहे.

   वैशाली बिराजदार ह्या वागदरी येथे अशाकार्यकर्ती म्हणुन  कार्यरत होत्या.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिब़ंधात्मक उपाय म्हनूण दि २३ मार्च २०२० पासून पुकारण्यात आलेल्या लाँक डाऊनच्या काळात त्यानी लाँक डाऊन संपेपर्यंत व आजतागायत गावातील जनतेला प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देत होत्या. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
Top