नळदुर्ग ,दि.८ :
शहापूर ता.तुळजापूर येथे बुधवार दि.७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधुन कोविड लसीकरणचे शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आस्मिताताई कांबळे यांच्या हास्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थातुन लसीकरणास उत्सर्फुत प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी १२६ नागरिकाना लसीकरण करण्यात आले.
यावेळी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.अस्मिताताई कांबळे यांच्या हस्ते लसीकरणाचे उदघाटन करण्यात आले. तुळजापूर पंचायत समितीच्या सभापती रेणुका इंगोले यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करण्यात आले.
४५ वयोगटातील व ७३ वयोगटातले आशा लाभार्थ्यांना लस देण्यात आले.शहापूर आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत दहिटणा .गुळहळ्ळी,गुजनूर ,वागदरी येथील लाभार्थ्यांनी लसीकरणास प्रतिसाद दिले.
प्रमुख उपस्थिती शहापूरचे सरपंच उमेश गोरे, उपसरपंच प्रदिप काळे, तंटामुक्त अध्यक्ष पांडुरंग मोरे, माजी सरपंच सौ उर्मिला धोंगडे, भरत मोरे, नानासाहेब पाटील, महावीर धोंगडे ,ग्रामसेवक सचिन राठोड, एम.सी. निलगार, गंगाधर जमादार , प्रशांत कुंभार , तुळजापूर आरोग्य अधिकारी डॉ पवार नळदुर्ग प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल
जानराव , शहापूर वैद्यकीय अधिकारी डॉ. यशवंत नरवडे, संगीता गायकवाड , आशा कार्यकर्ती भाग्यश्री काळे, कुसूम बनसोडे, अंगणवाडी कार्यकर्ती शोभा व्हंताळे, मंगल कोळी, आनंद गायकवाड , संगीता सोमवसे, रूकमिण खरात, जनाबाई खरात , ग्रामपंचायत सदस्य नागनाथ कांबळे, कर्मचारी हरी सादू कोळी, तानाजी जाधव ,पोलिस पाटील, बालाजी खरात ,दत्ता निकम आदीजण उपस्थित होते.