बुलडाणा,दि.८

"खिंचो न कमानों को, न तलवार निकालो...!, जब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो......ना जातीसाठी, ना मातीसाठी लढाई फक्त पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी .... हे ब्रिदवाक्य घेवून कार्य करणाऱ्या ' पत्रकार संरक्षण समिती ' ने 
बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदाची धुरा ख्यातनाम निर्भीड पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे यांच्या खांद्यांवर सोपवली आहे.


 आपले पञकारितेचे शिक्षण औरंगाबाद येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागाची उच्च पदवी व विशेष बीएड ही शैक्षणिक पात्रता पूर्ण करून दैनिक गावकरी, दैनिक लोकपत्र,दैनिक एकमत,दैनिक लोकमत नंतर स्वतःचे साप्ताहिक तेजस्वी प्रभात, उत्कर्ष प्रभात,दैनिक उत्कर्ष जनतेचा आदी वृत्तपत्रात विशेष लिखाण करुन आपली वेगळी ओळख आणी छबी निर्माण करुन पत्रकारिता श्रेत्रात एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करुन केवळ सकारात्मक पत्रकारितेच्या भरवशावर दैनिक लोकमंथन या वृत्तपत्रात निवासी संपादक या पदावर स्थिरावलेले आहे. 

सुमारे 20 वर्षांपासून विविध वृत्तपत्रांत काम करुन विविध समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे काम पुरुषोत्तम बोर्डे यांनी केले आहे,दैनिक लोकमंथनची  बुलडाणा जिल्ह्याची सर्व धुरा प्रामाणिकपणे सांभाळत असतांना दैनिक लोकमंथनचे लोक न्यूज २४ या चॅनेलची सुध्दा सर्व जबाबदारी पुरुषोत्तम बोर्डे यांच्यावर आली ती सुध्दा ते प्रामाणिक पणे पार पाडत आहेत,  

अनुभवाच्या भरवशावर पुरुषोत्तम बोर्डे यांच्या कार्याची दखल घेवून आणि पत्रकारांच्या न्याय - हक्कासाठी ते देत असलेला लढा लक्षात घेवून "पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे, सह प्रदेश उपाध्यक्ष रामभाऊ  खुर्दळ ( नाशिक ) व महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल चौधरी ( पुणे ) व जेष्ठ पत्रकार सुभाष लहाने यांनी पुरुषोत्तम बोर्डे  यांची  नियुक्ती बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे.

पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे हे धडाडीचे व निर्भीड स्पष्टवक्ते आहेत, ते जेव्हा भुमीका घेतात तेंव्हा ती सत्याची व अनेकांना न्याय देण्याची असते त्या मुळे त्यांचे विरोधक सुध्दा त्यांच्यापुढे नतमस्तक होतात, बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकारितेला सकारात्मकतेकडे नेणारे व पत्रकारांना स्वाभिमानाची,हक्क व कर्तव्याची जाणीव करून देणारे एकमेव पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे  आहेत त्यांची पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आता सर्व पत्रकारांना नक्कीच न्याय मिळेल ही खात्री आहे.
 त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असुन जिल्ह्याभरातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
Top