नळदुर्ग,दि.२७ :   
जळकोटवाडी (नळ ) ता. तुळजापूर  या गावामध्ये  कोरोनाच्या प्रादुर्भावबाबत   जनजागृती करण्यात येत  असुन प्रतिबंधात्मक उपाय सांगण्यात येत असल्याची माहिती संरपंच शिवाजीराव कदम यानी दिली. 

 तुळजापूर तालुक्यातील  जळकोटवाडी (नळ)  या गावची लोकसंख्या  दोन हजारापेक्षा अधिक असून  याठाकाणी चारशे कुटुंब आहेत.
शहरी भागाबरोबरच ग्रामिण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यने खबरदारी म्हणुन गावात सर्वेक्षण करुण ग्रामस्थात जागृती करण्यात येत आहे.

 जळकोटवाडीत कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून सरपंच , शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती प्रत्येकांच्या घरी जाऊन जनजागृती करत आहेत. आजाराविषयी लक्षणे जाणवताच वेळीच तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करीत आहेत. मास्कचा नियमित वापर करणे, सोशल डिस्टन्स पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, वेळोवेळी हात धुणे, ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांनी लस घ्यावे, असे सांगून रोगप्रतिकारशक्ती गोळ्याचे वाटपही करण्यात आले. यावेळी सरपंच शिवाजी कदम, मुख्याध्यापक उमेश भोसले, पोलिस पाटील देविदास चव्हाण, शासकीय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागनाथ पवार, अशोक राठोड उपस्थित होते.
 
Top