तुळजापूर, दि.27
तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे हिंदुराष्ट्र सेना श्री शिव प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 20 दात्यांनी रक्तदान केले.
यावेळी महेश बागल, अनिल पवार, आदिनाथ पवार, रोहित बागल , मेघराज बागल, अशोक बागल, अतुल बागल, अविनंद गायकवाड, विलास गायकवाड, महेश गायकवाड, बालाजी कोकाटे, ज्ञानेश्वर कोकाटे, गणेश भोसले, योगेश काळे, सागर बागल, रोहन कांबळे, लक्षम्ण क्षीरसागर आदी उपस्थित होते.