चिवरी, दि.२० : 
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे माझे गाव कोरोना मुक्त गाव अभियानाचा मंगळवार दि.२० रोजी शुभारंभ करण्यात आला. 

या अभियानांतर्गत गावात सर्दी, ताप ,खोकला तपासणी करण्यात आली. ४५ वर्षापुढील नागरिकांनी तात्काळ लस घेण्यासाठी जनजागृती करण्यात आली.यामध्ये जि.प.शाळेतील सहशिक्षक, आशा  कार्यकर्त्या, यांना प्रत्येकी ३० कुटुंबाची जबाबदारी देऊन त्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, ग्रामपंचायत लिपिक अनिल देडे, मुख्याध्यापक म्हेञे आर.आर, अंगणवाडी सेविका अनिता बिराजदार, उषाबाई नगदे, कल्पना शिंदे, रेशमा चिमणे, लक्ष्मी मेंढापुरे   आशा कार्यकर्ते अर्चना राजमाने, राजश्री कांबळे, आदींसह सहशिक्षक ,ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top