वागदरी,दि.२१: एस.के.गायकवाड
मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. उस्मानाबाद यांच्या आदेशानुसार वागदरी ता.तुळजापूर येथे ग्रामसेवक जि.आर.जमादार यांनी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन ग्राम कोरोना पर्यवेक्षकांची निवड केली.
यामध्ये मुख्याध्यापिका महादेवी जत्ते,सहशिक्षिका एम.आर.चौधरी, एस.एस.सांगळे,आर.पी.साखरे, अंगणवाडी मदतनीस रुपाली जाधव, सहशिक्षक तानाजी लोहार ,के. व्ही. जावळे आदींची ग्राम कोरोना पर्यवेक्षक म्हणून निवड करण्यात आली.
दि.२३ मार्च २०२० रोजी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे देशपातळीवर लागू केलेले लाँकडाउन सात आठ महिन्याने उठल्यानंतर गावोगावचे कोरोना सहायता कक्ष जवळपास बंद पडलेले होते. परंतू कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तोंड वर काढल्याने पुन्हा लाँकडाउन करण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे परत गावोगावी कोरोना सहाय्यता कक्ष सक्रिय होताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वागदरी ता.तुळजापूर येथिल ग्रामसेवक तथा कोरोना सहाय्यता कक्ष प्रमुख जी.आर.जमादार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. उस्मानाबाद यांच्या आदेशा नुसार सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन ग्राम कोरोना पर्यवेक्षिकांची निवड करून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात केली.
सर्व ग्रामस्धानी कोरोना प्रतिबधात्मक लस घ्यावी, मास्कचा वापर नियमित करावा ,साँनिटाझरचा वापर करावा ,विनाकारण घराबाहेर पडू नये आदीबाबत प्रबोधनपर फेरी काढली.
याप्रसंगी उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे, पोलीस पाटील बाबुराव बिराजदार, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पाटील,ग्रा.प.कर्मचारी सर्जेराव चव्हाण उपस्थित होते.