नळदुर्ग, दि. 30 
तुळजापूचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून नळदुर्ग येथे शुक्रवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीगृहात याठिकाणी नवीन कोविड केअर सेंटरचे उदघाटन करण्यात आले. 


यावेळी नवीन कोविड सेंटरच्या उदघाटन प्रसंगी रूग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये दोन रूग्ण पॉझिटीव्ह निघाले असून त्यांना व इतर तिघांना या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान या कोविड सेंटरमध्ये नळदुर्ग शहरासह परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे.  


याप्रसंगी तहसिलदार सौदागर तांदळे, सभापती रेणुका इंगोले, नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, पंचायत समितीचे गटविकास अधिकरी प्रशातसिंह मरोड, आरोग्य कल्यान समितीचे आनंद कंदले, नगरसेवक बसवराज धरणे, भाजपा शहराध्यक्ष पद्माकर घोडके, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, राहुल हजारे, भिमाशंकर बताले, पत्रकार विलास येडगे, दादासाहेब बनसोडे, लतिफ शेख, भिवा इंगोले, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे, मंडळ अधिकारी अमर गांधले, एन.यू शिंदे, तालुका अरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार आदीजन उपस्थित होते.
 
Top