तुळजापूर, दि.३० 

दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष जुबेर  शेख यांनी मुख्यमंत्री याना निवेदनाद्वारे केली आहे.


 सध्या सर्वञ कोरोनाचा प्रादुर्भाव  वाढत असुन जास्त प्रादुर्भाव हा  राज्यात वाढत  आहे.यामुळे  शासनाने यंदाची  दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे . सध्या तर महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती बघता राज्य सरकारच्या या निर्णयासोबत सर्व विद्यार्थी व पालकवर्ग सकारात्मक आहेत . 
यामुळे विद्यार्थ्यांची जमा करून घेतलेली परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना  परत करण्यात यावी अशी मागणी  जुबेर  शेख यांनी केली  आहे. 

 विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. परंतु निर्णय योग्य जरी असला तरी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व सामान्या समोर  आर्थिक संकट निर्माण झाले आहे.विशेष बाब म्हणजे सामान्य नागरिक , शेतकरी , कामगार , शेतमजूर हे आपल्या पाल्यांना शासकीय शाळेत पाठवतात.परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत केल्यास मदत होईल . 

त्यामुळे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय त्वरित घ्यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष जुबेर  शेख यांच्या वतीने करण्यात आली आहे .

 

जुबेर शेख , तुळजापूर तालुकाध्यक्ष,प्रहार जनशक्ती पक्ष 

 कोरोना या रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या निर्णयाला पालकांनी व विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची जमा करून घेतलेली परीक्षा शुल्क त्वरित परत करावी.
 
Top