लोहारा दि.३०: 
 उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी खासदार रविंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका मेडिकल असोसिएशन अध्यक्ष भरत सुतार यांनी नागरिकांना अत्यावश्यक असलेले नेबुलायजर (वाफ घेण्याची) मशीन व सॅनिटांयझरचे मोफत वाटप केले.

लोहारा शहरातील प्रभाग १७ मध्ये जवळपास १०० कुटुंबाला नेबुलायजर (वाफ घेण्याची) मशीन व सॅनिटांयझरचे  वाटप केले .कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे.सर्दी,ताप,खोकला,श्वास घ्यायला त्रास होणे, यासारखी लक्षणे नागरिकांमध्ये जाणवत आहेत.त्यामुळे समाजसेवा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तसेच  गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविला असल्याचे लोहारा तालुका मेडिकल असोसिएशन अध्यक्ष भरत सुतार यांनी सांगितले.


तसेच घरातील सर्व लहान मोठ्यांनी वाफ घ्यावी.यामुळे घसा खवखवणे, सर्दी इत्यादींची तीव्रता कमी होईल.कोरोना संसर्गजन्य विषाणू आहे. सांगितलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन  लोहारा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे यांनी यावेळी केली.
    

यावेळी युवासेना तालुका प्रमुख, अमोल बिराजदार,नगरसेवक शाम नारायणकर,शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, कोब्रा बहुद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष दत्ता निर्मळे,मा.पं स सदस्य सुधीर घोडके,  मेहबूब गवंडी,शिवण काटगावे,संतोष क्षिरसागर,चिकटे व्यंकट, बाळासाहेब घोडके,ज्ञानेश्वर काडगावे अक्षय घोडके, समर्थ मुरमे,बसवेश्वर चिकटे, शंकर माळी,संदीप स्वामी,नितीन चिकटे,शिवा सुतार, अमोल माळी,दत्ता माळी, दिनेश माळी,नाना वाघ, सतीश माळी,गोविंद घोडके,धोंडीराम माळी, मैनू बागवान, विशवनाथ माळी,रहीम जेवळे इत्यादी नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिमाशंकर डोकडे यांनी केले.
 
Top