“
उस्मानाबाद, दि.३०:
जिल्हा कौशल्य् विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद यांच्यावतीने जिल्हयातील दहावी , बारावी उत्तीर्ण झालेल्या आणि होणा-या विद्यार्थ्यांसाठी संगणक क्षेत्रातील विविध संधीबाबत मोफत ऑनलाईन करिअर मार्गदर्शन व समुपदेशन सत्राचे वेबिनार आयोजित करण्यात आलेले आहे.
या ऑनलाईन सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्राचार्य तथा व्याख्याते, साई कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन, नॅचरल शुगर कॅम्पस , रांजणी, ता. कळंब हे संबोधित करणार आहेत.
हे वेबिनार मंगळवार, दि. 04 मे 2021 रोजी दुपारी 12-00 ते 1-00 या वेळेत Google meet च्या माध्यमातून होणार असून या ऑनलाईन वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी Meeting URL: https://meet.google.com/kdw-xbti-qpq या लिंकचा वापर करुन जास्तीत जास्त विद्यार्थी ,पालकांनी आणि इच्छुकांनी ऑनलाईन सहभाग नोंदवावा .
अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02472-222236 वर संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद यांनी केले आहे.