तुळजापूर,दि.९ :
भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या तालुका सचिवपदी तुळजापूर येथील दिनेश कापसे यांची निवड करण्यात आली आहे.
चंद्रकांत तात्यासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उपाध्यक्ष शांताराम खुडे यांच्या आदेश घेऊन जिल्हाध्यक्ष अँड धिरज जाधव यांनी दि. ९ एप्रिल रोजी निवड केली. यावेळी नुतन सचिव कापसे बोलताना म्हणाले की, संघटनेच्या धोरणाचे पालन करून संघटना वाढीसाठी सदैव प्रयत्न करीन यावेळी बोलताना सांगितले .
यावेळी ॲड धिरज जाधव, विजय भोसले व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.