तुळजापुर, दि. ८  :

शहरातील १२४ भक्तनिवास येथे असणाऱ्या कोरोना सेंटरमधील सांड पाण्याच्या दुर्गंधीमुळे शेजारील नागरिकांना त्रास होत असून त्यांनी या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केलीआहे.

कोरोना सेंटरमधील पाईपद्वारे येणाऱ्या सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे शेजारी राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत असून या पाण्याला पाईपलाईनद्वारे मोठ्या गटारीत सोडण्याच्या मागणीसाठी शेजारील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार अर्ज दिल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना या प्रकरणी तातडीने दुरुस्ती करून शेजारी नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना केली. याची प्रत उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिली आहे.

यापूर्वी या संदर्भात शेजारच्या नागरिकांनी स्थानीक प्रसारमाध्यमांकडे तक्रार बोलून दाखवली होती.
या दुर्गंधी युक्त पाण्याचा त्रास शेजारच्या सदानंद आलुरकर ,अनंत नाईकवाडी,मोहन निकम ,प्रा.कुमार खेदाड, अशोकराव निकम यांना होत आहे. या पाण्याच्या दुर्गंधीमुळे शेजारी राहणाऱ्या  नागरिकांच्या  आरोग्याच्या प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालय आणि दिलेल्या पत्रानंतर नगरपरिषद तुळजापूर यांच्याकडून तातडीने या सांडपाण्याची विल्हेवाट लावली जावी अशी मागणी होत आहे.

 
Top