मुरुम, दि. 30 
पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी घरात घुसून हंटरने चौघांना मारहाण करून जखमी केल्याची घटना मुरूम पालिस ठाण्याच्या हद्दीत गुरूवार दि. 29 एप्रिल रोजी घडली आहे.याप्रकरणी  दोघाविरुध्द पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रहिम सुलतान खैराटे, रा. मुरळी कार्तिक भोकले अभिषेक मंडले, दोघे रा. बेरडवाडी यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 29 एप्रील रोजी 09.30 वा. सु. मुरळी येथील भरत नामदेव देडे यांच्या घरात घुसून अमोल यांसह त्यांची भाची सोनाली, भाचा यांना शिवीगाळ करुन हंटरने मारहाण करुन जखमी केले. सदर मारहाणीत देडे यांच्या बचावास आलेले गावकरी- अरुण नारायण सरवदे यांनाही हंटरने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या भरत देडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 
Top