ढोकी,दि. 30 :
उस्मानाबाद तालुक्यातील तडवळा (कसबे ) शिवारात शेतजमीन मोजनीच्या कारणावरून 8 जणांनी शिवीगाळ करून पिता- पुत्रास जीवे मारण्याची धमकी देवून शिविगाळ करून लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी 8 जणाविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तडवळा (कसबे ) ता. उस्मानाबाद येथील सावंत कुटूंबातील मिठ्ठु , बालाजी, अर्जुन, धनाजी, प्रमिला, किरण, भिमा, मारुती अशा 8 जणांनी दि. 28 एप्रील रोजी 3 वाजण्याच्या सुमारास तडवळा (कसबे) शेत शिवारात गावकरी बाबुराव व सागर बाबुराव लांडगे या दोघा पिता- पुत्रांना शेतजमीन मोजनीच्या व शेतात माल टाकण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देवून लाथाबुक्क्यांनी, काठीने, कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सागर लांडगे यांनी दि. 29 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 504, 506, 269, 188 सह कोविड- 19 विनियमन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.