नळदुर्ग, दि. 30 : 
तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा (नळ) येथे राहत्या घरासमोर गावठी हातभट्टी दारू अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असतांना नळदुर्ग पोलिसांना मिळून आले. याप्रकरणी एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.  

दत्ता हेमा चव्हाण, रा. देवसिंगा (नळ) तांडा, ता. तुळजापूर हे 29 एप्रील रोजी राहत्या घरासमोर अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 5 बाटल्या व एका कॅनमध्ये 11 लि. गावठी दारु (किं.अं. 810  अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असतांना नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या पथकास आढळले.


यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पोलिस ठाणे येथे गुन्हे नोंदवले आहेत.
 
Top