उस्मानाबाद,दि.२५ : 
कोरोनाच्या  महामारी मध्ये जिल्हाभरातून रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथे भरती होत आहेत. या अनुषंगाने शासकीय दवाखान्यामध्ये रुग्णांचा विचार करून याठिकाणी स्वच्छतेचे काम अधिक बळकट करण्याकरिता रोटरी क्लब उस्मानाबाद यांच्यातर्फे ३५ हजार रुपये खर्चुन स्वच्छतेचे  विविध साहित्य मदत म्हणून देण्यात आले. 



या ठिकाणी असणाऱ्या सफाई कामगारांचे काम अधिक गतिमान व सुलभ करण्यासाठी त्यांना अद्ययावत असे ड्राय मॉप, वेट मॉप, ट्रॉली, लॉबी डस्ट पॅन, पाणी साफ करण्यासाठी वायपर, निर्जंतुकीकरण करण्यासाठी केमिकल इत्यादी  साहित्य देण्यात आले.



याप्रसंगी डॉ. धनंजय पाटील जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. सचिन देशमुख, रोटरी क्लब उस्मानाबाद अध्यक्ष रो. अमरसिंह देशमुख, सचिव रो. इंद्रजित आखाडे, रो. सुरज कदम, इंद्रजित पाटील  आदी उपस्थित होते.
 
Top