तुळजापूर,दि.२५: 
   तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे आयोजित रक्तदान शिबिरात ३०  दात्यांनी रक्तदान केले. कोरोना महामारीत सिंदफळ ग्रामस्थांचा या उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

     
धनाजी नन्नवरे यांचा पुढाकारातून सिंदफळ येथील शिवाजीनगरमध्ये आयोजित रक्तदान शिबिराचा शुभारंभ सरपंच अर्जून कापसे यांचा हस्ते करण्यात आला. या प्रसंगी  ग्रामपंचायत सदस्य समाधान ‌‌ डोंगरे, धनाजी ननवरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
कोरोना चा पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती.  यावेळी एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

 रक्तदान शिबिराचा यशस्वीतेसाठी श्रीकांत व्यवहारे, रतन व्यवहारे, ऋतिक अवधूत, अमर जाधव, आकाश देवकर, गोरख देवकर, सचिन व्यवहारे आदींनी परीश्रम घेतले. 
 
Top