तुळजापूर,दि.२६ :
माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना अतिशय चांगली असून त्यामुळे कोरोना बाधित व्यक्ती शोधणे प्रशासनाला सुलभ होऊन त्यांच्यावर वेळीच योग्य उपचार वैद्यकीय पथकामार्फत करणे सुलभ होणार आहे. यासाठी  घरी येणाऱ्या प्रत्येक पथकास नागरिकानी आरोग्याची  तपासणी करून सहकार्य करण्याचे आवाहन  नगराध्यक्ष  सचिन ज्ञानोबा  रोचकरी  यानी केले आहे.

 तुळजापूर  नगरपालिकेच्या वतीने  मुख्याधिकारी  व  नगराध्यक्ष  यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर शहरात एकूण 10 पथकामार्फत प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.    

 माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेचा भाग म्हणून प्रभाग क्र. १ मध्ये  तपासणी पथकातील नगर परिषद कर्मचारी  वैभव पाठक,  प्रमोद  भोजने ,श्रीमती अमृतराव,  प्रफुल्ल खडागळे यांनी आज नगराध्यक्ष सचिन  रोचकरी यांच्या कुटुंबास भेट देऊन  कुटुंबातील सर्व व्यक्तींची तपासणी केली.  

 
 
Top