काटी, दि. २६ :
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश विश्वनाथ पांगे वय ६५ यांचे सोमवार दि.२६ रोजी दुपारी १२ वाजता हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.
त्यांनी अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही काम केले होते. भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावंत व तळमळीने कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची भारतीय जनता पक्षात ओळख होती.
त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी दोन वाजता येथील बारव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.