नळदुर्ग,दि.१७ :
सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांनी नियमाचे काटेकोरपणे पालन करुन घरीच थांबा व कोरोनाची साखळी तोडण्यास शासनास सहकार्य करावे, त्याचबरोबर नागरिकांनी मनात भिती न बाळगता लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन शिवसेनेचे उस्मानाबाद जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांनी नळदुर्ग येथे केले.
नळदुर्ग शहरात शनिवार दि. 17 एप्रिल रोजी बाळासाहेब ठाकरे चौक या नामफलकाचे अनावरण, भगवा ध्वजारोहण कट्टयाचे उदघाटन व शिवनेरी दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास जिल्हा उपप्रमुख कमलाकर चव्हाण, महिला जिल्हा प्रमुख शामल वडणे, तुळजापूर शहरप्रमुख सुधीर कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय भोसले, नळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदाले, उपतालुका सरदारसिंग ठाकूर, सुनिल गव्हाणे, युवासेना तालुका प्रमुख प्रतीक रोचकरी, युवा सेनेचे माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, शाम कणकधार, सोमनाथ म्हेत्रे, नेताजी महाबोले, मयूर हुलगे, सत्यजित कांबळे, चंदर सगरे, खंडू माने, ओंकार कलशेट्टी, शैलेश डुकरे, अफजल कुरेशी, दिपक घोडके, शमशोद्दीन शेख, सचिन शिंदे, अजय पवार आदीजण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार संतोष पुदाले यांनी मानले.