तुळजापूर,दि.१७:
गोरज गॅस, तामलवाडी ता. तुळजापूर येथील ऑक्सिजनच्या प्लॅन्टला भेट देऊन ऑक्सिजन उत्पादन प्रक्रियेचा उस्मानाबाद कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी  आढावा घेतला.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि उपचारादरम्यान आवश्यक असलेल्या ऑक्सिजची कमतरता भरून काढण्यासाठी उत्पादन प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना व्यवस्थापन यंत्रणेस  आमदार कैलास पाटील यांनी केल्या. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजन टाक्यांची कमतरता पडू न देण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलण्याचे त्यांनी यावेळी निर्देश  दिले. 

प्रशासकीय यंत्रणेसह आम्ही सर्वजण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहोत. नागरिकांनी देखील मास्क वापरणे, सॅनिटाइझर आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे व आपला जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती  आमदार पाटील यांनी केले .

यावेळी महिला आघाडी जिल्ह्याप्रमुख शामल  वडणे, पोलीस निरीक्षक  पंडित, तुळजापूर शहरप्रमुख सुधीर कदम, प्लँटचे व्यवस्थापक संतोष कुरे, सुधाकर लोंढे, नागनाथ मसुते, आप्पू गवळी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
 
Top