जळकोट,दि.१:
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत आलियाबाद ते भिमाशंकर देवस्थान रस्ता कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
तुळजापूर तालुक्यातील जळकोट, रामतीर्थ, नळदुर्ग येथून जवळच असलेल्या नयनरम्य निसर्गाच्या सानिध्यात प्रसिद्ध भिमाशंकर देवस्थान आहे.श्रावण महिण्यामध्ये येथे तालुक्यातुन हजारो भाविक येतात. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता.
जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे दोन किलोमीटर रस्ता मंजुर झाला असून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, अमृता चव्हाण, पांडुरंग चव्हाण, शिवाजी चव्हाण, पोलीस पाटील, हरीदास चव्हाण,बाबु चव्हाण, मनोज पवार, रोहीत पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रशांत भोसले उपस्थित होते.