तुळजापूर , दि.२८ :
तुळजाई नागरी सहकारी पतसंस्था व तुळजाई परिवार तुळजापुर (खुर्द ) यांच्यावतीने एमबीबीएस परीक्षेत यश मिळविल्याबद्दल डाॅ.अनिकेत अदिनाध ठेले, डाॅ.सौरभ सुनिल मस्के , डाॅ संग्राम प्रशांत अपराध आदीचा पतसंस्थेच्या वतीने देवीची प्रतिमा व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी पतसंस्थे अधक्ष पंडीत जगदाळे , उपअधक्ष राजाभाऊ देशमाने , प्रा. निलेश एकदंते व एमबीबीएस परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थीचे पालक अदिनाध ठेले, प्रशांत अपराध , सुनिल मस्के व पतसंस्थे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
डाॅ अनिकेत अदिनाध ठेले हा तुळजापुर खुर्द येथील नगरपरिषद क्रमांक 3 चा विद्यार्थी असुन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केले.