तुळजापूर, दि. २७ :
अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या वतीने तुळजापूर शहरातील १२४ कोविड सेंटर येथे मंगळवारी २०० कोविड रुग्णांना व २५ कर्मचाऱ्यांना फळ आहार (चिंकू-केळी) वाटप करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गायकवाड (गोंधळी), जिल्हा उपाध्यक्ष संतोष भोरे,युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत रसाळ, तुळजापूर तालुका अध्यक्ष अनंत रसाळ, युवा आघाडीजिल्हा कार्याध्यक्ष विजय मोरे, युवा आघाडी तालुका उपाध्यक्ष रविकिरण साळुंके, प्रकाश दबडे तसेच कोविड सेंटरचे इनचार्ज डॉ. अभिजीत झाडे, घुगे ,अंबुरे, हिरवे, महेश अडसूळ, अक्षय जगताप व कोविड सेंटरचे स्टाफ नर्सिंग कर्मचारी उपस्थित होते.
या आपत्तीच्या काळात गोंधळी समाजाच्या वतीने छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांनी दिली.