नळदुर्ग , दि. २८ :
तुळजापूर तालुक्यातील वडाचा तांडा याठिकाणी संसर्गजन्य कोरोना विषाणूबाबत गावात मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करून पुढील उपाययोजना संदर्भात गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
माझे गाव कोरोनामुक्त गाव अंतर्गत गावतील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचे ऑक्सिजन प्रमाण आणि शरीरातील तापमानाच्या नोंदी घेतल्या जात आहेत.
तसेच गावाबाहेर जाणा-या व येणा-या नागरिकावर लक्ष ठेवून त्यांना समुपदेशन करण्यात येत आहे.
गेल्या 13 महिन्यात गावात 1 ही रुग्ण नव्हता पण काल दि .२७ एप्रिल रोजी एक रुग्ण सापडल्याने गावातील नागरिकांना तात्काळ मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करून पुढील उपाययोजना आणि लसीकरण बाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी सरपंच सौ विजया चव्हाण, उपसरपंच निमबाई राठोड, ग्रामसेवक अवय्या सी आर, सदस्य लखन चव्हाण, ललिता चव्हाण,चांगुणा चव्हाण, मुख्याध्यापक बी के भोसले, कदम सर,आशा कार्यकर्ती बबिता राठोड, अंगणवाडी सेविका सूर्यवंशी ,विकास चव्हाण, जाधव आदीनी पुढाकार घेतले.