नळदुर्ग,दि.२८ :  सुहास येडगे
 केलेल्या कामाच्या बिलाची आदाई करण्यात यावी या मागणीसाठी नगरपालिकेसमोर करण्यात येणारे उपोषण कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर तात्पुरते स्थगित करण्यात आले असून या नंतर कामाच्या बिलाची आदाई नाही केल्यास  नगरपालिकेसमोर उपोषण करण्यात येणार आसल्याचे ठेकेदार दत्ताञ्य  मुळे  यानी नगपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


शहरातील राष्ट्रीय महामार्ग ते कुरेशी गल्ली मार्गे मराठा गल्ली पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण व नाली बांधकाम करण्यात आले आहे, या रस्त्याचे काम होवून दोन तीन वर्षे झाली आहे. पंरतु या कामाच्या ठेकेदाराला आदयाप पर्यंत कामाचे बिल मिळाले नाही. त्यामुळे संबंधीत ठेकेदाराने  निवेदनाव्दारे दि. २६ एप्रील २०२१ रोजी बिलाची आदाई करण्यात यावी, या मागणीसाठी संबंधीत ठेकेदारांडून पालिके समोर उपोषण करण्यात येणार आसल्याचे सांगितले होते. 

मात्र सध्या शहर व परिसरात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता हे उपोषण करणे योग्य नसल्याने दि. २६ एप्रील रोजी करण्यात येणारे उपोषण तुर्त स्थगीत करण्यात आले आहे.

 मात्र यानंतर पालिकेने सदरील कामाचे बिल देवून माझी उपासमार टाळावी अशी मागणी ही संबंधीत ठेकेदाराने केली आहे. अन्यथा  केलेल्या कामाच्या बिलाची आदाई करण्यात यावी म्हणून पुन्हा उपोषण करावे लागणार आहे. असे ठेकेदार दत्ताञ्य  मुळे यांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
Top