नळदुर्ग,दि.१४:  
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले असुन या आवाहनाला प्रतिसाद देत नळदुर्ग शहरातील  भिमनगर येथे  प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

 नळदुर्ग शहरातील भिमनगर येथील बौद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला संजय वेदपाठक, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, भाजपचे शहर सरचिटणीस  विशाल डुकरे, आशिष लोंढे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 यावेळी  बापू दुरुगकर,  योगेश सुरवसे, पिंटू बनसोडे, किशोर बनसोडे, उमेश गायकवाड, भाजप युवा वारीयर्सचे शहर उपाध्यक्ष अक्षय सुरवसे आदी उपस्थित होते.
 
Top