नळदुर्ग,दि.१५ : 

नळदुर्ग पोलिस ठाण्यांतर्गत येणा-या सिंदगाव ता. तुळजापूर येथे गुरुवार रोजी पोलिस पथकाने आचानक छापा मारुन साडे अकरा हजार रुपये किंमतीच्या बेकायदेशीर  देशी विदेशी दारु बाटल्या आढळल्याने ते जप्त करुन एका आरोपीस ताब्यात घेतले. 

जाफर अमीर शेख  वय 29 वर्ष रा. सिंदगाव ता. तुळजापूर, जि. असे रंगे हाथ पकडुन अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

गुरुवार  दि. १५ एप्रिल  रोजी सिंदगाव ता.तुळजापूर येथे स्थानिक गुन्हा शाखा उस्मानाबाद येथिल पोलिस पथकानी धाड टाकली. यावेळी बेकायदेशीर   देशी, विदेशी दारूच्या व बीअरच्या बाटल्या एकूण किंमत  ११ हजार  ४६८  रुपयेचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला. यावेळी वरील आरोपीस ताब्यात घेतले. याप्रकरणी नळदुर्ग  पोलिस ठाण्यात गु.र.न. 112 /2021  कलम 65  (ई) म.दा.का. प्रमाणे आरोपीविरुध्द गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.


पोलिस निरीक्षक  घाडगे  यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपनिरीक्षक भुजबळ पोलिस हवलदार  साळुंके, काझी ,ठाकुर चालक पोलिस नाईक गव्हाणे आदी स्थानिक  गुन्हा  शाखा उस्मानाबाद पोलिस कर्मचाऱ्यांनी  ही कारवाई केली.

 
Top