वागदरी : एस.के.गायकवाड
वागदरी ता.तुळजापूर येथे विविध ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

तुळजापूर तालुक्यातील  वागदरीच्या  भिमनगरमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३०व्या जयंती निमित्ताने जयंती उत्सव कमिटीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

प्ररंभी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पाटील, पो.काँ.संदिपान वाघमारे, पंचशील बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष नागनाथ बनसोडे, ग्रा.प.सदस्य रावसाहेब वाघमारे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध,व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून निळा ध्वजवंदन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन  रिपाईचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यांनी  तर आभार  अंबादास झेंडारे यांनी  मानले. या प्रसंगी ग्रा.प.सदस्या बकुलाबाई भोसले, कमलबाई धुमाळ, विद्या बिराजदार, जयंती उत्सव कमीटीचे सहादेव वाघमारे, दिपक झेंडारे, काशिनाथ वाघमारे, भारत वाघमारे, सुर्यकांत वाघमारे, वाल्मिक वाघमारे, अनिल वाघमारे, हणमंत वाघमारे, महदेव वाघमारे, चंद्रकांत वाघमारे, शिवाजी वाघमारे, व  महिला ग्रामस्थ उपस्थित होते.
येथील शालेय विद्यार्थ्यीनीनी आठ तास अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

येथील ग्रा.प.कार्यालयात  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे ,ह.भ.प.राजकुमार पाटील,यांच्या हस्ते करून  त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच दत्ता सुरवसे, ग्रा.प.सदस्य महादेव बिराजदार ,बकुलाबाई भोसले, कमलबाई धुमाळ, विद्या बिराजदार, व्यंकट पाटील , एस.के.गायकवाड, किशोर धुमाळ, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

 जि.प.प्रथमिक शाळेतही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मुख्याध्यापिका महादेवी जते,यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून त्यांना आभिवादन करण्यात आले. यावेळी सहशिक्षिका आर. पी. साखरे, एम.एम.चौधरी, अंगणवाडी कार्यकर्ती पदमिनी पवार, मदतनीस रूपाली जाधव, ग्रा.प.सदस्य दत्ता सुरवसे, नळदुर्ग महाविद्यालयाचे अधिक्षक लिंबराज सूरवसे,बालाजी बिराजदार आदी उपस्थित होते.
 
Top