जळकोट,दि.१५:मेघराज किलजे
कोरोनामुळे ग्रामीण भागही हैराण झाला आहे. ग्रामीण भागातही रुग्ण संख्या वरचेवर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जळकोट ता.तुळजापूर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात आत्तापर्यंत जळकोटसह परिसरातील १ हजार ५१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य यंत्रणेचा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण , सरपंच अशोकराव पाटील यांनी भेट देऊन आढावा घेतला. जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हंगरगा, नंदगाव व सलगरा उपकेंद्र येतात. जळकोट व परिसरातील नागरिकांना लसीकरण करण्याचे काम सुरू असून, कोरोना साथीला आळा घालण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.
दरम्यान आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण व सरपंच अशोकराव पाटील यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांनी लसीकरणा संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून जळकोट आरोग्य केंद्रातील लसीकरणा संदर्भात माहिती दिली.
त्याचबरोबर जनतेला लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.
या भेटी दरम्यान उपसरपंचपती बसवराज कवठे, बसवराज भोगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश येडगे, औषध निर्माता सी.एस. होनाळे, एस.एम. कुलकर्णी,एम.एफ. पठाण,डी. बी. लोखंडे, आरोग्य सेवक अण्णासाहेब कोळगे, एल एच व्ही कांबळे, मधुकर वाघमारे, प्रवीण कदम आदीसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.