चिवरी,दि.१५:
आजच्या युगात वाढदिवसावर मोठा खर्च करतात, श्रीमंत असो वा गरीब मात्र बडेजाव करून वाढदिवसानिमित्त पै पाहुणे, मित्रमंडळी यांना बोलावून हॉल, मंडप ,डेकोरेशन यावर तरुण वर्ग लहान मुलाचे पालक, वाढदिवस साजरा करताना दिसतात.
त्याचबरोबर अनावश्यक गोष्टीवर हजार रुपये खर्च करून पैशाची उधळपट्टी करताना पाहावयास मिळते. पण या परंपरेला छेद देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील माजी सैनिक तथा महालक्ष्मी करिअर ॲकॅडमी मोफत प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक विठ्ठल होगाडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गावातील गरजू व्यक्तींना घरपोच किराणा किटचे वाटप करून वाढदिवस साजरा केला.
यावेळी अतुल पाटील, अजित झिंगरे, पञकार राजगुरू साखरे, भागवत देशमुख,अभय साखरे, भिमाशंकर होगाडे आदी उपस्थित होते.