तुळजापूर,दि.१५ 

येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटरमध्ये रुग्णाबरोबर दुजाभाव करुन मनमानी करणा-यांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्यावतीने उस्मानाबाद जिल्हा शैल्य चिकित्सक  यांना निवेदनाव्दारे केली आहे. 

निवेदनात पुढे म्हटले आहे की, तुळजापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड 19 च्या संबंधित डॉक्टर व कर्मचारी हे दुजाभाव करत असून एखादा गरीब व सर्वसामान्य रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात आल्यास त्यांना लवकर व योग्य उपचार केले जात नाही .
कोरोनासारख्या महामारीच्या काळात सामान्य रुग्णांना , नागरिकांना समान वागणूक मिळणे अपेक्षित असताना  उलट त्यांना तुच्छतेची वागणूक दिली जात आहे. हाच प्रकार कोरोना लस घेण्याबाबत ही घडत असून बड्या धेंड्याना आल्याबरोबर लगेच लस दिली जाते. परंतु सर्वसामान्य नागरिकांना लस घेण्यासाठी दिवसभर  ताटकळत रांगेत उभे राहावे लागत आहे.
सदरील प्रकार हा निंदनीय असून संबंधित डॉक्टर व कर्मचारी यांची चौकशी  करून त्यांच्या कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे .
 
या निवेदनावर भ्रष्टाचार निर्मुलन समिती तालुका अध्यक्ष विजय भोसले,  समाजसेवक नानासाहेब डोंगरे यांची स्वाक्षरी आहे.
 
Top