तुळजापूर , दि. १५ :

प्रभू श्रीरामचंद्रचा वनवास हा  मार्गदर्शक आणि प्रेरणादायी  असुन तो सौभाग्य वाढवणारा, पापाचा नाश करणारा, हिंदू धर्माला वृद्धिंगत करणारा तसेच संघर्षामधून विजय प्राप्त करण्याची दिशा दाखवणारा जाज्वल्य इतिहास असल्याचे असे उदगार रामायणाचे गाढे अभ्यासक बा.ल. चोथवे यांनी काढले.

ते संस्कार भारती नांदेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चैत्रपालवी श्रीराम नाम गुण संकीर्तन २०२१ या महत्वकांशी कार्यक्रमांमधून श्रीरामाचा वनवास  या विषयावर व्याख्यानामधून मार्गदर्शन करीत होते. १४ वर्ष प्रभू श्री रामचंद्रांनी केलेला वनवास शब्द रूपात मांडताना रामायणकार बा. ल. चोथवे यांनी वाल्मिकी लिखित रामायण आणि इतर मान्यवरांनी लिहिलेल्या रामायणातील दाखले देत त्यांनी झूम वरून आयोजित केलेल्या या व्याख्यानामध्ये महत्वपूर्ण प्रसंग सांगितले.


याप्रसंगी प्रभुरामचंद्र यांनी वनवासाला नकार न देता अयोध्येतील जनतेनी माझ्यावर जसे प्रेम केले आहे. तेच प्रेम भरतला देऊन त्याला राज्य कारभार करण्यासाठी सहकार्य करावे अशा सूचना केल्या.  लक्ष्मण व सीता यांच्या सोबत १४ वर्ष वेगवेगळ्या अरण्यातील ऋषीमुनींच्या सानिध्यामध्ये त्यांनी अनुभवलेले प्रसंग अत्यंत प्रभावी शब्दांमध्ये रामायणकार चोथवे यांनी मांडले. 

रामायण सांगणे हा अलौकिक आणि अद्भुत अनुभव असल्याचे  सांगून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगांमध्ये अत्यंत सूक्ष्म निरीक्षणातून या व्याख्यानामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानामध्ये संजय जोशी यांनी शुभेच्छा तर समीक्षा चंद्रमोरे यांनी ध्येयगीत गायन केले. रामभक्ती गीत अपूर्वा कुलकर्णी व अभिवाचन उज्वला सदावर्ते यांनी केले. कार्यक्रमात प्रार्थना प्रतिभा योगी आणि निवेदन सौ अंजली देशमुख यांनी केले. संस्कार भारती नांदेड यांच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमध्ये मराठवाडा आणि खानदेश या भागांमधून शेकडो श्रोते  ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
 
Top