पुणे, दि.१५ :
ऊसतोड कामगाराचा मुलगा दिव्यांग व उच्चशिक्षित असलेला विकास चव्हाण याची फक्त पाचशे रूपयासाठी हत्या करण्यात आली आहे.विकासच्या मारेक-यांना तात्काळ अटक करून शासनाने त्यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत करावी, तसेच समाजावर वारंवार होणारे अन्याय, अत्याचार यापुढे मुळीच खपवून घेतले जाणार नसल्याचे पुणे जिल्हा अध्यक्ष कृष्णा चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे.
याबाबत राष्ट्रीय बंजारा विकास मिशनच्या वतीने जिल्हा अध्यक्ष कृष्णा चव्हाण व सहका-यांनी पोलीस अधिक्षक तसेच जिल्हाधिकारी यांना नुकतेच निवेदन देवुन न्याय मागितला आहे. विकास हा दिव्यांग असून त्याचे आई वडील हे ऊसतोड कामगार आहेत. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असूनही केवळ जिद्द व चिकाटीमुळे त्याने उच्च पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते. औरंगाबाद येथे परिक्षा देण्यासाठी आला असता फक्त पाचशे रूपयासाठी त्याची हत्या करण्यात आल्याचे नमुद केले आहे.
याप्रकरणी पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष कृष्णा चव्हाण, उपाध्यक्ष संजय जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.