तुळजापूर,दि.५
श्री तुळजाभवानी देविजींच्या मंदिरात सोमवार दि.०५ एप्रिल  रोजी रात्री ८ वाजेपासुन पुढील आदेश येईपर्यंत भाविकांना मंदिरात प्रवेश बंद

कोवीड १९ या साथीच्या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 04/04/2021 रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार श्री तुळजाभवानी देविजींच्या मंदिरात दि.05 एप्रिल  रोजी रात्री 8 वाजेपासुन पुढील आदेश येईपर्यंत भाविकांना मंदिरात प्रवेश बंद करण्यात येत आहे.

श्रीदेविजींच्या व उपदेवतांच्या दैनंदीन नित्योपचार पुजा या पुर्वापार प्रथेप्रमाणे महंत, पुजारी व मानकरी यांचे हस्ते होणार आहेत.

साथीच्या आजाराची गांर्भिय विचारात घेता, भाविकांची श्रीदेविजींवरील नितांत श्रध्दा इतकीच त्यांच्या जिवीताची योग्य ती काळजी घेणे या उद्देशाने महत्वपुर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाचे आदेशाप्रमाणे संयुक्तरीत्या घेण्यात आला आहे.

भाविकांनी महाराष्ट्र शासन व जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे योग्य ती खबरदारी घेऊन कोरोना विषाणु संसर्ग रोखणेकामी मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, या काळात भाविकांनी श्रीदेविजींचे ऑनलाईन दर्शन  सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर प्रशासनामार्फत करण्यांत येत आहे.
 
Top