तुळजापुर, दि. ५ : 

आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन  नगरपरिषदेच्या वतीने  124 भक्त निवास येथे तातडीने कूपनलिका खोदण्यात आल्याची माहिती  नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिली आहे.

नगर परिषद तुळजापूरच्या वतीने १२४ भक्त निवास (कोवीड सेंटर ) येथे  पाणी प्रश्न सतत भेडसावत होता त्या अनुशंगाने सोमवारी नविन कूपनलिका खोदण्याचा शुभारंभ नगर परिषदच्या  वतीने करण्यात आला. 

उपस्थित प्रभारी नगराध्यक्ष सचिन रोचकरी,अभियंता अशोक  सनगले, पाणी पुरवठा अधिकारी अर्जुन माने, महादेव शिंदे उपस्थित होते.
 येथे असणाऱ्या रुग्णासाठी ही कूपनलिका अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची गरज होती. त्यामुळे नगरपरिषदेने पाण्याची ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही यानिमित्ताने नगराध्यक्ष रोचकरी म्हणाले.
 
Top