जळकोट,दि.६ :
उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राचे उद्घोषक तथा दैनिक राजधर्मचे जिल्हा प्रतिनिधी हरिश्चंद्र संभा धावारे (वय ४८ वर्ष) रा. सांजा रोड, उस्मानाबाद यांचे कोरोना विषाणूंची बाधा झाल्याने निधन झाले.
ही घटना दि.६ एप्रिल रोजी घडली.
धावारे हे उस्मानाबाद येथील आकाशवाणी केंद्रात गेल्या २० वर्षापासून उद्घोषक म्हणून तर दैनिक राजधर्मचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. त्यांचा कोरोना विषाणूंची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठविण्यात आले होते. सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असतानाच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी, भाऊ व भावजयी असा परिवार आहे. त्यांनी यापूर्वी दैनिक जनप्रवास ,दैनिक लोकपत्र आदी दैनिकात काम केलेले आहे.