तुळजापूर , दि. ६ :
भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाने तुळजापुरात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे तुळजापूर  तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस तुळजापूर येथील भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. अनिल काळे यांच्या कार्यालयावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

तालुकाध्यक्ष संतोष बोबडे आणि खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी बोधले, तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य नागेश नाईक, माजी जिल्हा कोषाध्यक्ष बाळासाहेब श्‍यामराज,  पंचायत समिती माजी सदस्य साहेबराव घुगे, सुहास साळुंखे, गुलचंद व्यवहारे, दिनेश बागल, राम चोपदार, इंद्रजित साळुंखे, सागर कदम, सागर पारडे, बाळासाहेब भोसले, हनुमंत पाटील,सुदर्शन जाधव या आदी  उपस्थित होते.
 
Top