नळदुर्ग, दि. ७ 

 तुळजापूर तालुक्यातील वडाचा तांडा येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने विंधनविहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्यावतीने तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे  दि.22 मार्च रोजी करण्यात आली. मात्र दोन आठवड्याचा कालावधी उलटुनही पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांतून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  


 वडाचा तांडा ता. तुळजापूर येथील गावठाणास पिण्याचे पाणी पुरवठा करणारे स्त्रोत दरवर्षी प्रमाणे बंद पडले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हात, खुप दुरवर  भटकंती होत आहे. नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहे. ही बाब लक्षात घेवून ग्रामपंचायतीने  दि. 19 मार्चच्या मासिक सभेत याबाबत चर्चा करून  संपूर्ण गावास तातडीने  विंधनविहीर अधिग्रहण करून  पाणी पुरवठा करण्यासंबंधी ठराव घेण्यात आला आहे. 


 याबाबत तात्काळ निर्णय घेवून विंधनविहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने ग्रा.पं. ठराव व अर्ज देवून तुळजापूर तहसिलदार, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.   याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरून चौकशी तातडीने पाणीपुरवठा करण्याची मागणी नारिकातून होत आहे.
 
Top