नळदुर्ग,दि.७ :  
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासनाला  विनंती-कोविड-१९ च्या वाढत्या पार्श्वभूमिवर राज्य शासनाने राज्यात व तसेच जिल्हाधिकारी  यांनी   जिल्ह्यात  अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने ३० एप्रिल पर्यंत  बंद ठेवण्याचे आदेश  दिले आहेत, 

 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हे  आवश्यक आहे, त्याच अनुषंगाने  बँक वित्तिय संस्था, माइक्रो फायन्स कंपन्या यांच्या कर्ज वसूलीला पण स्थगिती मिळावी,दंडेलशाही, जोर जबरदस्ती ,छळवणुक, नोटिसा पाठवून कर्जदारास धमकावने यावर सुद्धा या वित्तीय संस्थाना  ताकीद देण्याची मागणी मनसे कार्यकर्ते यानी केली.  

त्याच बरोबर विज बिल वसुलीस स्थगिती देऊन विज तोड़णी सुद्धा थांबवली पाहिजे,आणि या काळात कड़क निर्बन्धामुळे जो आर्थिक फटका बसणार आहे,त्यामुळे या काळातील विज बिल माफ झाले पाहिजे,ज्यांचे हातावरचे पोट आहे,व्यापार बंद आहेत,ते आता प्रशासनाला सहकार्य करत आहेत,तर प्रशासन यांच्या बाजूने सुद्धा ठाम उभे राहिले पाहिजे.


 राजसाहेब ठाकरे यांनी या विषयाबाबत राज्य सरकारशी चर्चा केली आहे,व लोकांना बँका व वित्तीय संस्था व त्याच बरोबर विज बिल संदर्भात सरकारने दिलासा द्यावा अशी सूचना केली आहे,त्याच अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हाधिकारी   यानी या काळात लोकांना दिलासा म्हणून या वसूली विषयी स्थगिती द्यावी अशीही मागणी करुन जर हे होणार नसेल तर आम्हाला आमच्या पद्धतीने याबाबतीत हस्तक्षेप करावा लागेल असा इशारा मनसेनी प्रसिध्दी पञकाव्दारे दिला आहे.

  मनसे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे  ,  जिल्हा सचिव  जोतिबा येडगे , नळदुर्ग शहराध्यक्ष आलिम शेख , सचिव प्रमोद कुलकर्णी ,   उपाध्यक्ष  रमेश घोड़के  , सूरज चव्हाण (शहराध्यक्ष-मनविसे)
 
Top