नंदगाव,दि.७ :
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे बुधवार दि.७ एप्रिल रोजी पासुन लसीकरणास सुरुवात करण्यात आली असुन नागरिकातुन लसीकरण मोहिमेस उत्सर्फुत प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान १०७ लसीकरण करण्यात आले.

 शासनाने  टप्प्या टप्प्यात नागरिकांना लस उपलब्ध करून देत आहे. या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील   नंदगांव , लोहगाव मधील ग्रामस्थ प्राथमिक शाळेत जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेत आहेत

यावेळी आरोग्य सहाय्यक लग्गड डी.जे. यांनी समस्त नंदगाव व लोहगाव जनतेला लसीकरण करण्याचे आवाहन केले. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे, या लसीचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाही.  अफवाना बळी न पडता नागरिकानी  ही कोविड लसिकारण करून घ्यावे, नंदगाव ग्रामस्थांकडून उत्सर्फुत  प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे.  प्रत्येक बुधवारी नंदगाव येथे लसीकरण करण्यात येणार  असल्याचे सांगितले. 
 
लसीकरण लाभार्थ्यांची पहिल्यांदा नोंद झाली. त्यानंतर ऑक्सिजन पातळी, रक्तदाब याची तपासणी झाली, त्यानंतर प्रत्यक्ष लसीकरण करण्याचे काम चालू झाले.
पहिल्या लसीकरणात लस टोचक आरोग्य सेविका मगर एस.डी.  यांनी लाभार्थ्याला  लास दिली.
 

 नंदगावचे सरपंच श्रद्धानंद कलशेट्टी   सिध्देश्वर कोरे , पंचायत  समिति  गट नेते  वैभव पाटील , ग्रामसेवक धड्डे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय आधिकारी डॉ. आकाश एडके ,  डाँ मोकाशे , आरोग्य सहाय्यक लग्गड डी.जे. , आरोग्य सेवक जगताप डी.जे, आरोग्यसेविका मगर एस.डी, आरोग्य सेविका माशाळकर,  सर्व आशा कार्यकर्ती,  ग्रामपंचायत सदस्य,  प्राथमिक शाळा शिक्षक व संभाजी माने व ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top