तुळजापूर, दि. ७ : 

तुळजाभवानी मंदिर बंद आणि लॉक डाऊन परिस्थिती बाबत फेरविचार करावा अशी मागणी तुळजापूर येथील व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. व्यापारी वर्गाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केले.  कोणत्याही परिस्थितीत व्यापाऱ्याला सहकार्य झाले पाहिजे या बाजूचे आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.

नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी व्यापारी सोबत तहसीलदार सौदागर तांदळे यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फेरविचार करावा व्यापाऱ्यांना सहकार्य करणारा निर्णय घेऊन कोरोना  आटोक्यात आणण्यासाठी योजना निर्माण करावी, या योजनेला व्यापारी वर्ग निश्चितच सहकार्य करेल. परंतु संपूर्ण व्यापारपेठ बंद करून दररोज कुटुंबाचा खर्च चालवणे देखील अवघड परिस्थितीच्या काळात शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे, असेही या निवेदनामध्ये म्हटले आहे.

 या निर्णयाचा निषेध करीत असताना या सरकारने पुन्हा फेरविचार करावा अशी मागणीही केली आहे. मेन रोड आर्य चौक महाद्वार चौक येथील व्यापारी यांनी हे निवेदन दिले आहे. 

 
Top