तुळजापुर, दि. ६ : डॉ. सतीश महामुनी
रासायनिक औषधे आणि कीटकनाशके यांच्या वापरामुळे लोकांच्या आरोग्यावर झालेला परिणाम लक्षात घेऊन आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा उपयोग करून तरुण शेतकरी विषमुक्त शेतीकडे वाटचाल करीत असल्याचे क्षेत्र सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात दिसून येत आहे.
सांगली येथील द्राक्ष तज्ञ विजय जाधव आणि बार्शी येथील निवृत्त पोलीस अधिकारी नानासाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो तरुण शेतकरी विषमुक्त द्राक्ष आणि इतर पिकांची लागवड करून त्याची जोपासना करीत आहे, यादरम्यान त्यांना आवश्यक असणारे सर्व मार्गदर्शन विजय राव जाधव व नानासाहेब कदम यांच्याकडून अत्यंत अल्प माफक दरात केले जात आहे.
परिणामी तरुण शेतकऱ्यांना शेती व्यवसायाबद्दल आवड निर्माण झाली आहे गेल्या पाच वर्षापासून सोलापूर उस्मानाबाद सांगली या परिसरात रासायनिक खते औषधे यांच्या वापरामुळे माणसाच्या आरोग्यावर घातक परिणाम करणारे उत्पादन घेण्याऐवजी सेंद्रिय पद्धतीने स्वतः शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये औषधे व कीटकनाशके तयार करण्याचे तंत्र आत्मसात करून देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न या दोन मार्गदर्शकांच्या माध्यमातून सातत्याने होत आहे.
यामध्ये हे शेतकरी दोन वर्षाचा आपला अनुभव लक्षात घेऊन परिपूर्ण होतात त्यानंतर त्यांना या तांत्रिक मार्गदर्शनाची गरज राहत नाही ते स्वतः इतरांना मार्गदर्शन करू शकतात.
विषमुक्त निर्माण केलेले उत्पादन चांगल्या बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर त्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा आणि त्यांचे आर्थिक फायदे व्हावेत या उद्देशाने अमृतम कंपनीच्या वतीने विक्री नियोजन केले जात आहे देशामध्ये आणि देशाच्या बाहेर सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील द्राक्ष आणि इतर पिके निर्यात करण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन अमृतम कंपनीच्या वतीने केले जात आहे.
बळेवाडी येथील तरुण शेतकरी समाधान पाटील आणि सज्जन पाटील यांनी आपला इतर तरुण शेतकर्यांना सोबत घेऊन विजयराव जाधव व नानासाहेब कदम यांचे मार्गदर्शन घेतले या मार्गदर्शनानंतर समाधान पाटील म्हणाले की अमृतम कंपनीच्या मार्गदर्शनामुळे आम्हा तरुण शेतकऱ्यांना शेती व्यवसायाची चांगली गोडी लागली आहे आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे विषमुक्त शेती हा अनेक दिवसापासून ऐकत असलेला विषय यशस्वीपणे स्वीकारला आहे. शेतकरी सजन पाटील यांनी हा कमी पैशात निर्यातक्षम पिक घेण्याचा आपण दिलेला मोलाचा सल्ला आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यास पुरेसा आहे आहे अशी प्रतिक्रिया दिली.
विषमुक्त शेतीचा हा नवा प्रयोग अलीकडच्या काळात नव्या आणि तरुण शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या आवडीचा विषय ठरू लागला आहे उस्मानाबाद ते तुळजापूर परिसरामध्ये शेती क्षेत्रामध्ये झालेला हा बदल आणि जगाच्या बाजारपेठेमध्ये उस्मानाबाद आणि तुळजापूर परिक्षेत्रातील तरुण शेतकऱ्यांनी केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे त्याला अमृतम् कंपनी आणि विजयराव जाधव व नानासाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाची मोठी मदत मिळाली आहे.