ताज्या घडामोडी


 उस्मानाबाद,दि. ७
 
शहरातील रोटरी क्लब ऑफ उस्मानाबाद तर्फे बुधवार दि.7 रोजी सकाळी 10 वाजता बांधकाम कामगांरांना मास्क वाटप करून कोरोना महामारीपासून स्वतःचा बचाव करून आपल्या कुटूंबाची काळजी घेण्यास आवर्जून सांगण्यात आले.


 कोरोना महामारीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून रूग्णांची संख्याही प्रचंड वाढत असून मृत्युचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येकाने माझे कुटुंब माझी जबाबदारी समजून सतत मास्कचा वापर असा संदेश रोटरीतर्फे बांधकाम कामगारांना यावेळी देण्यात आला.

 या प्रसंगी रोटरीचे अध्यक्ष अमरसिंह बाजीराव देशमुख,सचिव इंद्रजित आखाडे,रो.रविंद्र साळुंके,रो.सुनिल गर्जे,रो.संतोष शेटे,रो.संजय देशमाने,रो.सुरज कदम, रो.पी.आर.काळे, रो.रणजित रणदिवे,रो.संजय शेटे आदीसह बांधकाम कामगारही उपस्थित होते.
 
Top