तुळजापूर,दि.७:
येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्राचार्य डॉ. शेखर जगदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आरोग्य दिनानिमित्त बुधवारी येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. व कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना आरोग्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
उपजिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षातील कोरोना रुग्णांना कर्मचारी हनुमंत शिंदे व शांताराम पवार यांच्या हस्ते बिस्किटे पुड्याचे वाटप करण्यात आले. सर्व रुग्णांना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रारंभी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीधर जाधव व कर्मचारी संजय देवकते यांचा एन एस एस प्रमुख प्रा. शामकांत डोईजोडे , प्रा. सचिन सगरे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यानंतर कोरोना रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हस्ते बिस्कीट पुडे देण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका, शिपाई , कर्मचारी उपस्थित होते.
यासाठी उपप्राचार्य प्रा.रवी मुदकना, डॉ. एन. डी. पेरगाड , प्रा. प्रदीप हंगरगेकर, प्रा. रवींद्र आडेकर, प्रा.बाबुराव सूर्यवंशी, प्रा. समीर माने, प्रा.गिरीश ओवरीकर प्रा.विशाल धनके ,प्रा.गायकवाड, कर्मचारी मारुती माने, लहुजी डेरके, अनिल कुलकर्णी , धनंजय मगर यांनी पुढाकार घेतला .